
धिरज संतोष बजाज हिवरखेड प्रतिनिधि :-
राष्ट्र निर्माते तथा सनातन वैदिक संस्कृतीचे कीर्तिस्तंभ, धर्म-संस्कृतीचे रक्षक, आर्य गौरव योगेश्वर श्रीकृष्ण यांच्या जन्मोत्सवाच्या पावन निमित्ताने माहेश्वरी महिला मंडळातर्फे दिव्य देवयज्ञाचे आयोजन करण्यात आले.
माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. मनीषा राठी व सचिव सौ. गायत्री टावरी यांच्या नेतृत्वाखाली योगेश्वर श्रीकृष्ण यज्ञशाळा, हिवरखेड येथे हा अनुष्ठान सौ. निशा टावरी यांच्या पौराहित्याखाली संपन्न झाला.
धर्म-संस्कृती रक्षणार्थ आयोजित या देवयज्ञात यजमान दाम्पत्य – सौ. वीणा-राजेश राठी, सौ. प्रिया-हरि सदाणी, सौ. मनीषा-राजेश राठी व सौ. सरिता-पंकज राठी यांनी वेदमंत्रांच्या जयघोषात यज्ञात आहुती अर्पण केल्या.
या प्रसंगी विशेष उपस्थिती म्हणून श्रीमती कांतादेवी फोफलिया, सौ. रेखा फोफलिया, बोहरा परिवारातील सौ. बबिता, सौ. वैशाली, सौ. शुभ्रा, सौ. कविता, कु. निकिता टावरी, सौ. चंदा राठी व सौ. गायत्री टावरी यांनी गायत्री मंत्रोच्चारासह आहुती प्रदान केली.
यज्ञानंतर राष्ट्र-कल्याण व संस्कृती संवर्धनासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली, त्यानंतर भजन गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या अनुष्ठानाच्या यशस्वितेसाठी संस्कृती संवर्धन संघाचे श्री. नवल टावरी, श्री. पंकज राठी, श्री. शांतिलाल गोमाशे, श्री. मोती फोफलिया व श्री. विनय राठी यांनी अथक परिश्रम घेतले.