
अजगाव:-तालुका प्रतिनिधी -अनंत मते
अंजनगाव सुर्जी_या तालुक्यातील हिरापूर येथे गोपाळकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भागवत सप्ताह २९ तारखेपासून प्रारंभ झाला आहे कुमारी परमेश्वरी दीदी गुरुकुंज मोझरी यांचे वाणीतून संगीतमय श्रीमद् भागवत श्रवण करण्याची संधी हिरापूर निमखेड बाजार परिसरात लोकांना प्राप्त झाली आहे . या सप्ताहामध्ये संयोजकांनी उभारलेल्या भव्य सभा मंडपामध्ये परिसरातील भागवत श्रवण करणाऱ्या लोकांची गर्दी वाढतच आहे. रोज चार ते पाच तास श्रोता वर्ग हे प्रवचन ऐकत आहेत. या मंचावरून परमेश्वरी दीदींचे वडील ग्रामगीताचार्य राईजी प्रभू शेलोटकर व आई ललिताताई शेलोटकर यांच्या मार्गदर्शनात लहान मुलांसाठी सप्ताहामध्ये सकाळी शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे परिसरातील शेकडो विद्यार्थी या शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत. या सप्ताहाला भेट देण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते लेखक प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक प्रेम कुमार बोके व सामाजिक कार्यकर्ते रमेश भाऊ सावळे यांनी सुद्धा भेट दिली आहे. परमेश्वरी दीदींना साथ देण्यासाठी ऑर्गन वादक निलेश महाराज मोहरकर तबलावादक मंगेश भाऊ वानखडे पॅड वादक निलेश भाऊ खडसे तसेच या सप्ताहामध्ये विविध झाकी साकार करण्यासाठी संजय भाऊ मुधोळकर व श्रीराव काका यांची साथ लाभत आहे हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपाल कृष्ण मंडळाचे अध्यक्ष रुपेश फरकुंडे व मंडळातील कार्यकर्ते तसेच हिरापूर निमखेड बाजार परिसरातील तरुण वर्ग व अंजनगाव पंचायत समितीचे माजी सभापती विनोद भाऊ टेकाळे व परिवाराचे मार्गदर्शन लाभत आहे