
तेल्हारा प्रतिनिधी=
तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील बंधू भगिनींच्या वतीने मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त सहाय्यता निधीत रुपये ११०००/-चा धनादेश बुधवार उपविभागीय अधिकारी, आकोट यांना सुपूर्द करण्यात आला.तेल्हारा तालुक्या तील तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील बंधू-भगिनी तर्फे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सहाय्यतार्थ योगदान म्हणून एक दिवशीय मानधन असा एकूण ११ हजार रुपयांचा, सहाय्यता निधीचा युनियन बँक ऑफ इंडिया शाखा तेल्हारा चा धनादेश क्र. ९१९७५३ बुधवार दि.२१ ऑक्टोबर २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी आकोट यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी पोलीस पाटील सर्वश्री अरविंद गजानन अवताडे दहिगाव, गणेश दादाराव पाथ्रीकर अटकळी, विनोद रामदास दबडगाव चापानेर, प्रमोद शेषराव कोरडे कोठा यांचे हस्ते सदरहू धनादेश प्रदान करण्यात आला आहे.