
राजु भास्करे :अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवैध गोवंश वाहतूक, अवैध गोमांस विक्री व गोवंश कत्तलीविरोधात मोठी कारवाई केली. पूर्णा नगर येथील कसाईपुरा परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत ६३० किलो गोमांस, गोवंश जातीच्या गायी, गोवंशाचे कातडे, कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि मालवाहू वाहन असा एकूण १३ लाख ७९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अमरावती ग्रामीण घटकात अवैध गोवंश वाहतूक, अवैध गोमांस विक्री व गोवंश कत्तलीच्या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मा. श्री. निकेतन कदम यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पूर्णा नगर येथील कसाईपुरा परिसरात छापा टाकण्यात आला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गोमांस तसेच गोवंश कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि वाहन जप्त केले. या प्रकरणी मोहम्मद जावेद , मोहम्मद एजाज शेख ईसा , अब्दुल मोमीन अब्दुल करीम , अब्दुल कदीर शेख युसूफ , अंसार अब्दुल लतीफ, आणि मकसूद अहमद बशीर अहमद ,अब्दुल कलाम अब्दुल जब्बार यांच्याविरुद्ध आसेगाव पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. निकेतन कदम आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश झाल्टे, सागर हटवार, अंमलदार शिवाजी घुगे, मंगेश लकडे, सचिन मसांगे, हर्षल काळे, रुपेश गावंडे, विवेक घोरमाडे, संजय प्रधान, नईम शहा, पोलीस आसेगाव पूर्णा येथील श्रेणी पोउपनि सोमेश्वर कास्देकर, अंमलदार अंकुश टाले , आरसीपी मधील अंमलदार आकाश आमटे, तेजेश्वर प्रधान, रामेश्वर सुरडकर, काकासाहेब ठवरे यांनी केली.
अवैध गोवंश कत्तलीविरोधात अमरावती ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध कत्तल व गोमांस विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.