
हिवरखेड प्रतिनिधी :-
हिवरखेड चे जेष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य, राजकारणात रोख ठोक आणि खंबीर भूमिका घेणारे, स्पष्ट वक्ता म्हणून परिचित असणारे श्री. वसंतरावजी ओंकारे यांचे दि 12 सप्टेंबर शनिवार रोजी आकस्मिक दुःखद निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे..
शनिवार सकाळी ते नेहमी प्रमाणे आपल्या इष्टमित्रांसह चर्चा करीत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी ऑक्सिजन लावून त्यांना तेल्हारा येथे रेफर केले परंतु तेल्हारा येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
वसंतरावजी ओंकारे हे हिवरखेड चे माजी सरपंच सुरेश ओंकारे यांचे वडील, माजी सरपंच अरुणाताई ओंकारे यांचे सासरे, माजी ग्रा. पं. सदस्य आचल ओंकारे ह्यांचे आजोबा होते.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच मोठ्या संख्येने नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी निवासस्थानी गर्दी केली. हिवरखेड विकास मंच,
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ या सह विविध संघटनांतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
ओंकारे हे जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद च्या महात्मा गांधी विद्यालयातील 14 वर्ग खोल्यांचे बांधकाम, संगणक युक्त विज्ञान भवन, रंगमंच, आठवडी बाजारात ओट्याचे बांधकाम उर्दू शाळेकरिता 32 खोल्यांचे बांधकाम, चंडिका चौकातील सौंदर्यीकरण यासह विकासाची अनेक कामे केली होती. तत्कालीन खासदार आणि माजी मंत्री स्व. भाऊसाहेब फुंडकर यांचे ते अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. अकोला जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळीच छाप निर्माण केली होती.
त्यांची अंतिम यात्रा दि. 13 सप्टेंबर रविवार रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या निवासस्थानावरून अकोट रोड स्मशानभूमीसाठी निघणार आहे.
2 Comments
Chief Editor
विदर्भ एक्सप्रेस न्युज
Chief Editor
गुरुदेव इस मोरे मुख्य संपादक