
तेल्हारा ता.प्रतिनिधी:..नंदकिशोर नागपुरे
विद्यार्थ्यांची अदम्य जिद्द, शिक्षकांचे अथक परिश्रम आणि उत्कृष्ट नियोजनाच्या बळावर पीएम श्री जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा माळेगाव बाजारने झोनस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये ऐतिहासिक यश संपादन केले आहे. सांघिक तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारांत चमकदार कामगिरी करत शाळेने सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले.
२९ ऑक्टोबर २०२६ रोजी पीएम श्री शाळा माळेगाव बाजार येथे झोनस्तरीय क्रीडा स्पर्धांचे अत्यंत दिमाखदार व उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत माळेगाव बाजार शाळेच्या खेळाडूंनी विविध सांघिक खेळात वर्चस्व गाजवत प्रथम क्रमांक पटकावला.
सांघिक क्रीडा प्रकारांतील विजेतेपद:
कबड्डी: सीनियर मुले, ज्युनियर मुले आणि ज्युनियर मुली (प्रथम क्रमांक)
क्रिकेट: सीनियर मुले आणि सीनियर मुली (प्रथम क्रमांक)
खो-खो: सीनियर मुली (प्रथम क्रमांक)
व्हॉलीबॉल: सीनियर मुली (प्रथम क्रमांक)
सांघिक खेळांसोबतच बुद्धिबळ, कॅरम, लांब उडी, उंच उडी, थाळीफेक आणि गोळाफेक या वैयक्तिक क्रीडा प्रकारांतही शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत पदकांची लयलूट केली.
उत्कृष्ट आयोजन अन् सांघिक योगदान:
शाळेचे मुख्याध्यापक तथा झोन सेक्रेटरी सचिन ठोंबरे सर आणि केंद्रप्रमुख शरद ठाकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नेटके आयोजन करण्यात आले. क्रीडा शिक्षक श्री. कीर्तने सर आणि क्रीडा अधिकारी सौ. मोडोकार मॅडम यांनी खेळाडूंना दिलेले उत्तम प्रशिक्षण या यशाचा पाया ठरले.
उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन शामस्कर सर यांनी केले, तर चिमणकर सर यांनी खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. विशाल नागले सर यांनी स्पर्धा नोंदींचे नियोजन, मुकुंदे सर यांनी समालोचन आणि सारंग जैन यांनी गुणलेखनाची जबाबदारी पार पाडली. इंगळे मॅडम, ठोंबरे मॅडम व पाटील मॅडम यांनी केलेली सजावट, तसेच वासनकर मॅडम व काळपांडे मॅडम यांनी खो-खो व लंगडी स्पर्धांचे केलेले नियोजन कौतुकास्पद ठरले. वाघमारे सर यांनी गुणनोंदींची जबाबदारी सांभाळली, तर रामभाऊ यांनी सर्व व्यवस्था उपलब्ध करून दिली.
या यशस्वी आयोजनात व विद्यार्थ्यांच्या यशात डाबेराव सर, प्रफुल इंगळे सर, चित्ते सर, प्रवीण चोपडे सर, बिहाडे सर, सौ. कुईटे मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शाळेच्या या अभूतपूर्व यशाबद्दल विजयी खेळाडू, मार्गदर्शक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.