
भिमकिरण दामोदर= हाता प्रतिनिधी
-अंत्री मलकापूर गावामध्ये बी सी आय प्रकल्प अंतर्गत जागतिक कापूस दिवस साजरा करण्यात आला तसेच क्षेत्रभेट घडून आणण्यात आली. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात कापूस पूजनाने अध्यक्ष श्रीकृष्ण साबळे तसेच प्रमुख पाहुणे विठ्ठल डांगे व अनिल देशमुख यांचे उपस्थितीत करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्ताविक क्षेत्र प्रवर्तक गौतम तायडे यांनी केले तसेच बीसीआय प्रकल्पाविषयी संपूर्ण माहिती गावातील क्षेत्र प्रवर्तक सतीश गायकवाड यांनी दिली त्यानंतर सापशिडी खेळाच्या माध्यमातून कोणत्या गोष्टीचा अवलंब करावा याविषयी सुळे साहेब यांनी सांगितल त्यानंतर शेतकऱ्यांनी फवारणी करताना काय काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन स्वाती तांदळे यांनी केले तसेच, सर्व शेतकऱ्यांची क्षेत्रभेट घडून आणली यामध्ये त्यांना कपाशीवर येणाऱ्या मुख्य किडीची ओळख तसेच क्षेत्रभेटीवर लावण्यात आलेले पिवळे चिकट सापडे,निळे चिकट सापडे फेरोमन ट्रॅप यांचे महत्त्व समजून सांगण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता हागे मॅडम यांनी केले या कार्यक्रमाला हाता सागद अंत्री मलकापूर गावातील शेतकरी हजर