
तेल्हारा तालुका प्रतिनिधी-नंदकिशोर नागापुरे
मनब्दा:
येथील शेतशिवारात गावचे पटवारी श्री. रसाळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ई-पीक पाहणी मोहीम उत्साहात पार पडली. शासनाच्या निर्देशानुसार शेतातील पिकांची अचूक नोंदणी व्हावी आणि शेतकऱ्यांना पीक विम्यासह इतर शासकीय योजनांचा लाभ सहज मिळावा, या उद्देशाने ही पाहणी करण्यात आली.
यावेळी पटवारी श्री. रसाळे साहेब यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीचे महत्त्व पटवून दिले व स्वतः शेतावर जाऊन पिकांची पाहणी केली.
या प्रसंगी ग्रामस्थ व शेतकरी नरेंद्र पाटील, सुनील पाटील, सदानंद पाटील, दीपक पाटील, उमेश पाटील, रामदास पाटील, वैभव पाटील, संजू भाऊ तायडे यांच्यासह मनब्दा गावातील इतर शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पीक पाहणीचे काम सुरळीतपणे पार पाडल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.