
अनंत मते तालुका प्रतिनिधी अंजनगाव सुर्जी
अंजनगाव सुर्जी -हिरापूर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दिनांक 29 /8 /2026 पासून कुमारी परमेश्वरी दीदीचे वाणीतून ज्ञान सप्ताह भागवत कथा दिनांक 4 /9 /2026 रोजी समाप्त झाली. समारोप दिनांक 4 /9/ 2026 ला भागवतकार दीदीचे लहान भगिनी कुमारी ज्योती उर्फ अष्टमी शेलोटकर यांचे दुपारी साडेतीन ते पाच वाजेपर्यंत कीर्तन व दोन्ही बहिणींनी उपस्थित शेकडो भाविक भक्तांसमोर चित्त थरारक दांडपट्टा /तलवारबाजी व मशाल ज्योतीचे प्रयोग केले यावेळी हिरापूरची गार्गी मते, वैष्णवी हेलमारे ,वैष्णवी मळई, ओम दामोदर सहारे यांनी सुद्धा प्रात्यक्षिक सादर केले या गावातील 70 ते 80 मुला-मुलींनी लाठीकाठी हल्लाबोल व मनोरे यासारखे शारीरिक स्वरक्षणाचे शिक्षण दीदीचे वडील रामजी प्रभू शेलोकर व माताजी ललिताबाई शेलोटकर गुरुकुंज आश्रम यांनी या सप्ताहात मुला मुलींना दिले प्रात्यक्षिकातून दिनांक 5 /9/ 2026 रोजी निघालेल्या मिरवणुकीतून गावामध्ये प्रात्यक्षिक सादर केले यानंतर भजनी मंडळ ढोल दिंडी महिला मंडळाचे भारुड गवळणी द्वारे उपस्थितांना प्रबोधन करण्यात आले यामध्ये हिरापूरचे स्थानिक भजनी मंडळ, निमखेड बाजार, खिराळा कसबे गव्हान,बोर्डी येथील भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता दहीहंडी स्पर्धा ही सायंकाळी साडेचारला पार पडली यामध्ये हिरापूर गावचे शंभू प्रेमी ग्रुपचे गोविंदांनी दहीहंडी फोडून विजय प्राप्त केला नंतर आमदार गजानन लवटे शिवसेना संघटक महेंद्र दिपटे, माजी सभापती विनोद टेकाळे, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील तिजारे गोपाल कृष्ण मंडळाचे अध्यक्ष रुपेश फोर कुंडे यांच्या हस्ते सर्व विजेते मुलींचे व भजनी मंडळींचे अभिनंदन करून बक्षीस प्रदान करण्यात आले त्यानंतर सर्व आजूबाजूच्या परिसरातील लोकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले