
तेल्हारा -तालुका प्रतिनिधी: नंदकिशोर नागापुरे
पाथर्डी येथील शेतशिवारात शासकीय निर्देशानुसार ‘ई-पीक पाहणी’ मोहीम नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. शेतातील पिकांची अचूक नोंदणी व्हावी, तसेच शेतकऱ्यांना पीक विम्यासह इतर शासकीय योजनांचा लाभ वेळेत व सहज मिळावा, या मुख्य उद्देशाने या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी गावचे सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक तसेच कृषी विभागाचे कर्मचारी आणि ग्रामपंचायत सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी करण्याची संपूर्ण प्रक्रिया शेतकऱ्यांना समजावून सांगत याचे महत्त्व पटवून दिले.
या मोहिमे दरम्यान पाथर्डी गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ई-पीक पाहणीचे काम अत्यंत पारदर्शक व सुरळीतपणे पार पडल्याबद्दल उपस्थित सर्व शेतकरी व ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानत समाधान व्यक्त केले.