
तेल्हारा प्रतिनिधी:-
तेल्हारा : शहरातील नगर परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या मोफत गणवेशाचे अद्याप वाटप करण्यात आलेले नाही. शाळा सुरू होऊन तब्बल चार महिने उलटून गेले असतानाही विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहावे लागत असल्याने पालक व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तेल्हारा शहरातील नगर परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना तातडीने मोफत गणवेश वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी आज संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले. तेल्हारा शहरातील न प शाळामध्ये गोरगरिबांची मुले शिक्षण घेत असुन त्याच्या मुलभूत सुविधांकडे न प प्रशासनाचे सपशेल दूर्लक्ष केले आहे .विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची टाकी अस्वच्छता असुन R O फिल्टर बंदअसल्याचे आढळुन आले आहे .त्याच बरोबर शासनाकडून विद्यार्थी मिळणारे मोफत गणवेश शाळा सुरु होऊन 4 महिने झाले तरीही वाटप आद्यपही करण्यात आला नाही .
त्यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजसत्व मागील वर्षीचे जुने गणवेश परिधान करून यावे लागते आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे या सर्व बाबी कडे पालकांनी अनेक वेळी तोंडी मागणी करून देखील उडवा उडावीचे उत्तरे मिळाली आहेत .न प सत्ताधारी नगराध्यक्षा व शिक्षण सभापती यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष देणेआवश्यक असुन हा गंभीर बाबीची दखल घेण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे आज निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून पुढील 15 दिवसांच्या आत सर्व पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.चार महिने उलटूनही विद्यार्थ्यांना मूलभूत शैक्षणिक सुविधेचा लाभ मिळत नसल्याने नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
15 दिवसांच्या आत गणवेश वाटप न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन मोफत गणवेशाचे वाटप करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी सुरज साळुंके प्रा.सचिन थाटे, गौरव धुळे, विनोद वाघ, मनीष गवळी ,विठ्ठल चव्हाण ,सुनील हिवराळे यांच्या सहपालक विद्यार्थी उपस्थित होते.