
अजय प्रभे:- मूर्तिजापूर प्रतिनिधी
मूर्तीजापुर एका विरुद्ध गुन्हा दाखल
माना, दि. ७ सप्टेंबर २०२६ : कत्तलीच्या उद्देशाने दोन गोवंशीय जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या इसमावर माना पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत दोन बैलांसह टाटा एस वाहन असा एकूण २ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
माना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामठी फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. माना पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, जामठी फाट्यावरून जामठी गावाच्या दिशेने एका टाटा एस वाहनातून दोन गोवंशीय जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जाणार आहे. त्यावरून जामठी फाटा परिसरात सकाळी 08/00 वाजता नाकाबंदी दरम्यान मिळालेल्या माहिती प्रमाणे टाटा एस वाहन क्र. एमएच २८ एबी ०७४४ हे धोकादायक व बेदरकारपणे येताना दिसून आले. पोलिसांनी वाहन थांबवून पंचांसमक्ष तपासणी केली असता वाहनामध्ये दोन पांढऱ्या रंगाचे बैल निर्दयतेने दोरीने बांधलेल्या अवस्थेत घेऊन जाताना आरोपी वाहनचालक मोहम्मद तौफीक मो. रफीक वय ३७ वर्षे, रा. मोहम्मदिया प्लॉट, मुर्तीजापूर, जि. अकोला हा मिळून आला
जप्त मुलद्देमाल ३० हजार रुपये किमतीचा एक बैल, ३५ हजार रुपये किमतीचा दुसरा बैल व सुमारे २ लाख रुपये किमतीचे टाटा एस वाहन, असा एकूण २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी माना पोलीस ठाण्यात अपराध क्र. ३४५/२०२६ अन्वये कलम २८१ भा.न्या.सं. तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील कलम ५, ५(अ), ५(ब), ९ व प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम कलम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माना पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैधरीत्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर वाहतुकीविरुद्ध पोलिसांकडून कठोर कारवाई सुरू राहणार आहे.
सदरची कार्यवाही श्री. अचिंत चांडक साहेब, पोलीस अधिक्षक अकोला, श्री. बी. चंद्रकांत रेडडी साहेब, अपर पोलीस अधिक्षक अकोला, श्रीमती वैशाली मुळे मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग मुर्तिजापूर यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन माना चे ठाणेदार गणेश नावकार, पोउपनी प्रदीप जोगदंड पोहेकॉ उमेश हरमकर बनं ३२५, पोकॉ आकाश काळे, बनं २३०८ यांनी केली आहे.