स्व.मुरलीधर बेलाडकर यांच्या निधनानंतर खासदार अनुप धोत्रे यांची बेलाडकर कुटुंबीयांना सांत्वनपर भेट
तेल्हारा प्रतिनिधी:-

तेल्हारा : तालुक्यातील खापरखेड येथील ज्येष्ठ नागरिक स्व. मुरलीधर पांडुरंग बेलाडकर यांच्या निधनाबद्दल अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. श्री. अनुपदादा धोत्रे यांनी आज बेलाडकर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
स्व.मुरलीधर बेलाडकर हे पत्रकार विलास बेलाडकर, आशिष बेलाडकर व ज्ञानेश्वर बेलाडकर यांचे वडील होते. त्यांचे दि. ४ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन सुना, चार नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.
खासदार अनुपदादा धोत्रे यांनी बेलाडकर कुटुंबीयांची भेट घेऊन दुःखात सहभागी होत कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी दिवंगत मुरलीधर बेलाडकर यांच्या आठवणींना उजाळा देत कुटुंबीयांना धीर दिला.
या सांत्वनपर भेटीप्रसंगी खापरखेड ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष खोटरे, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नथ्थुजी किसन शेळके, डॉ. बाबुराव शेळके, तेल्हारा नगरपालिकेचे सदस्य अतुलजी विखे, दिलीप पाटील फोकमारे, प्रशांत सावरकर, राजेंद्र फोकमारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्व.मुरलीधर बेलाडकर यांच्या निधनाने खापरखेड परिसरात हळहळ व्यक्त होत असून, विविध स्तरांतून बेलाडकर कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.