तेल्हारा तालुक्यात BSNL चा कारभार,
आंधळं दळतंय नी कुत्र पीठ खातंय

तेल्हारा प्रतिनिधी :-
विकास दामोदर
BSNL ही दूरसंचार सेवा सरकारी आहे त्यामुळे सर्वसामान्यांना परवडेल अशी सेवा BSNL चे काही प्रामाणिक अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करतात. पण काही बेईमान कर्मचारी खाजगी कंपन्याना फितूर होतात याचच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तेल्हारा पासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर वसलेलं घोडेगाव,या गांवात पत्रकार विजय घोडे यांनी आपल्या संवाद कौशल्य व स्वभावाच्या जोरावर शेकडो BSNL सिमकार्ड लोकांना माफक दरात विकली सुरवातीला खूप उत्कृष्ट पद्धतीने रेंज मिळत होती परिणामी आणखी शेकडो लोकांनी आपले इतर खाजगी कंपनीचे सिमकार्ड BSNL मध्ये पोर्ट केले कारण कमीत कमी खर्चात BSNL उत्कृष्ट सेवा पुरवीत होती परंतु लगेच 15 दिवसात अचानक BSNL नेटवर्क गायब झाले त्यावर काही सुज्ञ ग्राहकांनी स्थानिक BSNL अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे मिळत होती आज चालू करू उद्या चालू करू असे करता करता आज तब्ब्ल 4महिने उलटून गेलेत तरीसुद्धा नेटवर्कचा पत्ताच नाही. त्यानंतर BSNL कार्ड ज्यांच्या माध्यमातून विकत घेतले होते त्या व्यक्तीला बोलावण्यात आले व टॉवर जवळ गेले असता रेंज पुरवण्यासाठी जे साधन टॉवरवर लावले होते तेच तेथून गायब होते. परंतु टे नेमके कोणी काढले? का काढले? व कशासाठी काढले? हे प्रश्न मात्र अनुत्तरितच राहले.
एकीकडे BSNL खूप चांगल्या प्रकारे आपल्या सेवेचा गाजावाजा करित प्रचार प्रसार करत आहे तर दुसरीकडे चालू टॉवरवरून सेवा पूरवणारे यंत्र काढून टाकले जाते हे सर्वसामान्यांना न उलगडणारे कोडेच निर्माण झाले आहे. शिवाय पूर्वीसारखी आताची पिढी साधी भोळी राहली नाही काही नवयुवकांचे म्हणणे येत आहे खाजगी कंपनीचे शेकडो कार्ड BSNL मध्ये पोर्ट करण्यात आले त्यामुळे कदाचित खाजगी कंपनीने BSNL मधील काही फितूरांना हाताशी धरून ही BSNL ची उत्कृष्ट सेवा बंद केली असेल.
तरी BSNL च्या जवाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात जातीने लक्ष घालून घोडेगाव येथील BSNL ची सेवा पूर्वरत करावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. अन्यथा BSNL चा गाजावाजा करणारांची देखील ‘बोलाचीच कढी व बोलाचीच भात”, राहणार आहे व ज्यांनी घोडेगाव येथील सेवा पुरविणारे यंत्र काढले त्यांचेवर देखील कायदेशीर कार्यवाही करावी हीच BSNL प्रेमिकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.