
सिरसोली प्रतिनिधी :-विनोद सगणे
सिरसोली =येथील स्व बाबासाहेब खोटरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया मध्ये ब्रह्मकुमारीज केंद्र अकोट तर्फे नशा मुक्ती पंधरवडा अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद खोटरे सर तर प्रमुख मार्गदर्शिका .उमा दीदी, अनुराधा निकम, राठोड सर, दिलीप बंड उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राठोड सर यांनी केले.
बीके उमा दीदी यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती व युवकांची कर्तव्ये याबाबत उद्बोधन केले. तसेच वर्ग पाच ते बारावीच्या विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा दिली.
या कार्यक्रमाला नंदाताई गावंडे मॅडम, प्रमोद आखरे सर, उमेश तेलगोटे सर,
योगेश मैड सर, संगीताताई डाबेराव मॅडम, के. एस. सोलकर सर, गजानन भारसाकळे,प्रतीक सर, डोंगरे मॅडम व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. संतोष नहाटे यांनी केले तर प्रास्ताविक राठोड सर यांनी केले. आभार प्रदर्शन अंजली खोटरे मॅडम यांनी केले.
