
पंचगव्हाण प्रतिनिधी :– अनिल भाकरे
तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण उबारखेड,खेलदेशपांडे येथे अवैध दारू विक्री राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी तेल्हारा पोलिसांकडे निवेदन सादर केले आहे. गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
गावात अवैध दारू सहज उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून, अनेक तरुणांचे भविष्य धोक्यात येत असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. दारूच्या व्यसनामुळे कुटुंबांची आर्थिक परिस्थिती ढासळण्यासोबतच घरातील शांतताही भंग होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दारूच्या नशेत महिलांना व मुलांना मारहाण तसेच शिवीगाळ होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे गावातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, कुटुंबांमध्येही तणावाचे वातावरण निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
अवैध दारू विक्री बंद करण्याबाबत संबंधितांना यापूर्वीही ग्रामस्थांनी समज दिली होती. मात्र, त्यानंतरही अवैध दारू विक्री सुरूच असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पंचगव्हाण उबारखेड परिसरात अवैध दारू विक्रीला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी पोलिसांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि गावातील तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनावर स्वाक्षरी करणारे ग्रामस्थ
मिलिंद गवारगुरु, आदित्य गवारगुरु, रोहित गवारगुरु, सुरज गवारगुरु, रोहीत गवारगुरु, रोषन गवारगुरु, आनंद गवारगुरु, सम्राट गवारगुरु, शैलेश गवारगुरु, शैलेश गवारगुरु, उमेश गवारगुरु, समर्थ गवारगुरु, रोहीत गवारगुरु, निलेश गवारगुरु, राजरत्न गवारगुरु, सुरज गवारगुरु, विक्रम तायडे, सुरज गवारगुरु, संतोष गवारगुरु, संदीप गवई, जयाबाई गवारगुरु, प्रिया गवारगुरु, प्रीती प्रदीप इंगळे, प्रमिला एकनाथ गवारगुरु, हर्षा गवारगुरु, प्रिया गवारगुरु, रेखा गवारगुरु, वत्सला गवारगुरु, वर्षा गवारगुरु, रेखा गवारगुरु, अनिता गवारगुरु आदी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनाची प्रत दारूबंदी अधिकारी, अकोला यांनाही माहितीस्तव व आवश्यक कार्यवाहीस्तव सादर करण्यात आली आहे.