अकोट तालुका प्रतिनिधी;-विठल येवोकार
बोर्डी,शिवपुर,राहनापुर,गावामध्ये मागील काही महिन्यांपासून एस टी.महामंडळाची वाहतूक सेवा बोर्डीतील घोगानाल्यावरील पुलाचे काम अर्धवट राहिले असल्याने व पावसामुळे रस्ताखराब झाल्यामुळे बससेवा बंद झाली होती.त्यामुळे असंख्य शालेय विद्यार्थी यांना अकोट येथे शिक्षणाकरिता तसेच,वरिष्ठ नागरिकांना नाहक भुर्दंड पडत होता.ही अडचण तसेच नागरिकांना,शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास दूर व्हावा याकरीता बोर्डी येथील उपसरपंच राजेश भालतिलक यांनी क्षणाचाही विलंब न करता शिवपूर येथील कर्तव्यदक्ष सरपंच मनीष महले यांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊन त्यासंदर्भात दोन्ही गावाकडून निवेदन देण्याचे ठरविले व बोर्डी शिवपूर,राहनापुर,येथील बससेवा पूर्वरत चालू करण्यासाठी या संदर्भात आगर व्यवस्थापक अकोट यांना निवेदन दिले.व आगर व्यवस्थापक अकोट यांनी विलंब न करता आज सायंकाळी बस सेवा तात्काळ सुरू केली.यामुळे समस्त गावामध्ये समाधान व्यक्त होत आहे.निवेदनदेतेवेळी बोर्डी गावचे उपसरपंच राजेश भालतिलक,शिवपूरचे सरपंच मनीष महले,तंटामुक्ती अध्यक्ष अमोल आतकड,विनोद गये,राजेश खिरकर,संजय अंभोरे,साजिद शेख, शंकर कंकाळ,बंडू नाना चेडे,विलास मोहोड,अनिल धर्मे,अर्जुन भगत,प्रशांत गायकी,विठ्ठल मानकर,यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.