दर्शवर्षीप्रमाणे यावर्षी पाऊस पौर्णिमेच्या मुहूर्तावर श्री गजानन महाराज पादुका संस्थान च्या यात्रेची सांगता झाली.
गजानन महाराजांचे परम शिष्य श्री झामसिंग डोंगर सिंग राजपूत यांनी महाराजांना मुंडगावला आमंत्रित केले होते.१६ जानेवारी १९०८ गुरुवार रोजी महाराज मुंडगाव ला आले. गजानन महाराजांची भजनी दिंड्या सहित रथात बसून मिरवणूक काढली झामसिंगानी दुसऱ्या दिवशी १७ जानेवारीला महाप्रसादाचे आयोजन केले. परंतु महाराजांनी चतुर्दशी आहे महाप्रसाद करू नका असे सांगितले. परंतु याकडे सर्वाचे दुर्लक्ष झाले. ग्रामस्थांनी महाप्रसादाचे आयोजन केले.परंतु क्षणात मुसळधार पाऊस, वारा, वादळ सुटले सर्वांना आपली चुक कळली. सर्वांनी महाराजांची क्षमा मागितली. तेव्हा महाराजांनी आकाशाकडे पाहिले सर्व वातावरण शांत झाले. महाराजांनी उद्या महाप्रसाद करा असे सांगितले. दुसऱ्या दिवशी महाराजांच्या आज्ञेनुसार पौष पोर्णिमेला शनीवार दि. १८ जानेवारी १९०८ रोजी महाराजांच्या उपस्थितीत भंडारा झाला तीच प्रथा आजही सुरू आहे.
यात्रा महोत्सवानिमित्त श्रीमद भागवत कथेचे व सातही दिवस हरिकीर्तनाचे आयोजन तसेच श्रींच्या भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. काल पौष पौर्णिमेला सकाळी ह. भ.प. श्री गजानन महाराज हिरुळकर यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले. यात्रेचे औचित्य साधून संत बायजाबाई ग्रंथालयातील अभ्यास करणाऱ्या व शासकीय सेवेत रुजू होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सकाळी 11 ते रात्री आठ वाजेपर्यंत भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. गावात श्रींची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत पंचक्रोशीतील भजनी दिंड्या सहभागी झाल्या. संध्याकाळचा दहीहंडी उत्सवाला हजारो भक्तांची मांदियाळी जमली.
उत्सव यशस्वी करण्याकरता ग्रामीण पोलीस स्टेशनचे अकोटचे ठाणेदार व कर्मचारी यांनी जबरदस्त बंदोबस्त ठेवला, पादुका संस्थानचे सर्व पुरुष व महिला सेवाधारी, भांडारगृह समिती, दानदाते,अन्नदाते, भजनी मंडळ, संस्थानाचे कर्मचारी व समस्त गावकरी यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळांनी सर्वांचे आभार मानले