विष्णुदास महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तेल्हारा येथे राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त उद्योजकता प्रेरणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
युवादिनी निमित्ताने साप्ताहिक कार्यक्रमाचे आयोजन मध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .
उद्योजकता प्रेरणा कार्यक्रमाला उदघाटन म्हणुन लाभलेले तेल्हारा तहसीलचे नायब तहसीलदार विकास राणे साहेब यांच्या उपस्थितत उदघाटन पार पडले सर्व प्रथम स्वामी विवेकानंद माँ जिजाऊ यांच्या प्रतिमचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन संस्थेचे प्राचार्य उईके, तर प्रमुख उपस्थितीत शेंगोकार सर,मनसुटे मॅडम यांची उपस्थिती होती .
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन नायब तहसीलदार विकास राणे साहेब यांनी केले सोबतच प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन केले
युवा पिढीने स्वतःच्या मनातील भीती बाजूला सारुन येणाऱ्या प्रत्येक अडचणी सामना करून त्यावर मात करावा सोबतच स्वताची क्षमता ओळखुन आपले ध्येय निश्चित करून साध्य करण्यासाठी कठीण परिश्रम करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन त्यांनी त्याच्या मार्गदर्शनातुन केले.
व्यवसाय शिक्षण ही आय टी आय च्या मुलांना मिळालेले सर्वात मोठी संधी असुन या संधीचे सोनं प्रशिक्षणार्थीनी करावी असा आशावाद सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी संस्थते सपन्ना झालेली संस्था स्तरीय तंत्र प्रदर्शनी कार्यक्रमाचे बक्षीस वितरण कार्यक्रम सुद्धा पार पडला .यास्पर्धेत प्रथम क्रमांक वायरमन ट्रेड ने तयार केलेलं सेफ्टी गार्ड हेल्मेट या प्रोजेक्ट ला तर द्वितीय क्रमांक विजतंत्री ट्रेड च्या प्रशिक्षणार्थीनी तयार केलेले वेस्ट मटेरीयल पासुन वीजनिर्मिती मिळवला तर तृतीय क्रमांक ड्रेस मेकिंग च्या प्रशिक्षणार्थी यांना पटकावल्या बद्दल स्मृती चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते विजेत्या प्रशिक्षणार्थी यांना गौरविण्यात आले .त्याच बरोबर जिल्हा स्तरीय तंत्रप्रदर्शनी मध्ये द्वितीय क्रमांक मिळवण्याऱ्या सेफ्टी हेल्मेट या प्रोजेक्ट तयार करणारे प्रशिक्षणार्थी व व्यवसाय निदेशक वसतकार सर व श्री मानकर सर यांचा सुद्धा सत्कार प्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत मध्ये प्रशिक्षणार्थी यांनी आपल्या कला गुणांना ओळखुन वाव देणे गरजेचे आहे .सोबतच युवकांनी या युवादिनी व्यसनाधीतेन पासून दूर राहवे असे प्रतिपादन असे प्राचार्य उईके यांनी केले.
युवादिनी निमित्ताने वक्तृव स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते या स्पर्धेत प्रशिक्षणार्थीनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.या कार्यक्रमाला संस्थेचे शिल्प निदेशक व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री थाटे सर यांनी केले आभार प्रदर्शन श्री वसतकार सर यांनी केले.
युवकांनी स्वतःचा मध्ये लपलेले क्षमता ओळखुन ध्येय निश्चित करून कठीण परिश्रमातुन यश संपादन करावं – श्री विकास राणे साहेब नायब तहसीलदार तेल्हारा)
