विनोद सगणे :-सिरसोली प्रतिनिधी
अकोला: – शिरसोली येथील युद्धभूमीवर आयोजित शौर्य दिन कार्यक्रमात 1803 च्या इंग्रज मराठा युद्धात धारातीर्थी पडलेल्या शूरवीर सैनिकांना शासकीय इतमामात पोलिसांची सशस्त्र मानवंदना आणि उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी शासनातर्फे पुष्पचक्र अर्पण.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील शिरसोली गावा नजीक 1803 मध्ये गाॅल्हेरचे दौलतराव शिंदे, नागपूरकर रघुजीराजे भोसले व लॉर्ड ऑर्थर वेलस्ली आणि कॅप्टन स्टीवनसन्स यांचे नेतृत्वात इंग्रज मराठा युद्ध झाले होते या युद्धामध्ये इंग्रज व मराठा तर्फे मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली होती यामध्ये शूरवीर सरदार करताजीराव जायले आणि कॅप्टन केन यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये दोघेही धारातीर्थी पडलेत होते. या युद्धात शौर्य व पराक्रम गाजवून धारातीर्थी पडलेल्या शूरवीर सैनिकांना मानवंदना करण्यासाठी दरवर्षी शौर्य दिनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी आयोजित कार्यक्रमांमध्ये कॅप्टन डोबाळे व अनंत गावंडे यांच्या प्रयत्नाने प्रथमताच शासनातर्फे मानवंदना देण्यात आली. उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर व तेल्हारा तहसीलदार सोनवणे यांनी विर हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून शासनातर्फे मानवंदना दिली. तर अडगाव ग्रामीण पोलीसांच्या वतीने मेजर नेवारे यांचे नेतृत्वात सशस्त्र मानवंदना देण्यात आली. उपस्थित विविध शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी पंचक्रोशीतील नागरिक व कर्ताजीराव जायले यांचे वंशज यांनी मौन श्रद्धांजली वाहली.2017 पासून नियमित युद्धभूमीवर इतिहास प्रेमी, गावकरी व कर्ताजीराव जायले परिवाराचे वंशज शौर्यदिन साजरा करतात. शौर्यदिन जिल्ह्यात लोकांनी नव्याने जोपासलेल्या एका परंपरेचा भाग बनला आहे. अरविंद बानेरकर सौ.मयुरी बानेरकर व संस्कार बानेरकर यांचे दांडपट्टा लाठीकाठी सादरीकरण,प्रयत्न कराळे यांचे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन अभिजित सावरकर यांचे शिवराई नाणे प्रदर्शन व आर्कीटेक्ट अनंत गावंडे यांनी केलेले झालेल्या युद्धाचे सचित्र वर्णन या वर्षीचे वैशिष्ट्य ठरले.
अठरापगड जातीतील शूरवीर सैनिकांचा जाज्वल्य इतिहास शौर्य दिनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवत आहे.या ऐतिहासिक अमूल्य ठेव्याच्या जतनासाठी आवश्यक असलेली शासन स्तरावरील सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी लोणारकर यांनी यावेळी बोलताना दिले. करताजीराव जायले यांचे वंशज उमेश जायले, योगेश जायले ,मोहन जायले, तुषार जायले यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजनासाठी डॉ जय अनंत गावंडे, ऋषिकेश खोटरे,संघर्ष प्रभाकरराव सावरकर,कॅप्टन सुनिल डोबाळे,तुषार जगतराव जायले अविनाश डिक्कर,सुनिल जायले
प्रशांत मनोहरराव विखे,सुनिल पांडुरंग जायले,,सौ.जयश्री तुषार जायले,अतुल जायले,
वाल्मिक महादेवराव भगत
विजय पाटील जायले, गजानन उत्तमराव सावरकर,नागेश रामदास जायले,सदानंद गुलाबराव खारोडे जगदीश पाटील जायले रा मुंबई ,गोपाल सुरेश जायले ,दिपक डाखोरे,
ॲड.विश्वासराव नेरकर,वैभव नेरकर,प्रा.संदीप बोबडे
सुरेन्द्र पाटील खोटरे
दिलीपभाऊ अंधारे,सुरज अंधारे डॉअशोकराव बिहाडे स्व.बाबासाहेब खोटरे विद्यालय व मुख्याध्यापक मिलींद खोटरे,जि.प.मराठी शाळा सिरसोली मुख्याध्यापिका सौ सुनंदा गावंडे इंगळे, उर्द जि प शाळा मुख्याध्यापक वजाह सर,केद्रप्रमुख किशोर कोल्हे ,उमेश जायले व जायले ,वैभव आखरे ,निलेश आखरे,श्रीकृष्ण पाटील मामनकर, राजेंद्र सपकाळ, गिरीश गावंडे, राजु पाटील गावंडे, निलेश नागमते यांनी यशस्वितेसाठी प्रयत्न केले. आभार संघर्ष सावरकर यांनी मानले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन अनंत गावंडे यांनी केले. राजू जालंदर यांनी दिलेल्या भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.