हिवखेळ प्रतिनिधी :-धिरज बजाज
हिवरखेड तेल्हारा राज्य मार्गावर हिवरखेड ते गोर्धा दरम्यान पंचमुखी हनुमान मंदिर जवळ कार पलटून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सदर कार मध्ये माटरगाव येथील प्रवासी आणि अन्य असे 5 जण असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातातील एक जण दगावल्याची आणि अन्य चार जखमींमधील दोघांचे प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. जखमींना उपचारासाठी आधी तेल्हारा आणि नंतर अकोला येथे रुग्णालयात नेल्याची प्राथमिक माहिती. घटनेची माहिती मिळताच हिवरखेड ठाणेदार गजानन राठोड आणि पोलीस ताफा घटनास्थळी हजर झाला. त्यांनी रुग्णवाहिका बोलावून जखमींना रवाना केले.
