नंदकिशोर नागापुरे:-दानापुर प्रतिनिधी
दानापुर (वा) नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने जिल्हा परिषद कन्या शाळा दानापूर येथे बेटी बचाव बेटी पढाव या शालेय उपक्रमांतर्गत कन्या पूजन कार्यक्रम संपन्न झाला.
नवरात्री उत्सवामुळे सगळीकडे चैतन्यदायी वातावरण तयार झाले असताना याच उत्सवाचे औचित्य साधुन हा उपक्रम राबवण्यात आला दिवसेंदिवस मुलीच्या जन्माचे प्रमाण घटत आहे म्हणून आपल्या संस्कृतीत स्त्रीला सृष्टीचा मुलाधार मानले जाते हा विचार रुजवण्याची आवश्यकता आहे सर्वप्रथम माँसाहेब जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका नयना कळंबे शिक्षिका अनुराधा डीवरे वैशाली नवलकार संगीता ठोंबरे गीता घायल यांनी शाळेतील सर्व विद्यार्थिनींचे कुंकुम तिलक व पुष्प देऊन पूजन केले कार्यक्रमाला उपस्थित सर्व मुलींना भेटवस्तू व गोड खाऊ वाटप करण्यात आला कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिक्षक सचिन ठोंबरे संभाजी सुताडे नितीन वानखडे यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सूर्यकांत वैलकार उपाध्यक्ष धम्मपाल वाकोडे व सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
