आकोट विधानसभा मतदारसंघात आमदार प्रकाश भारसाकडे हे सलग तिसऱ्यांदा अकोट विधानसभा मतदारसंघात विजयाची हॅट्रिक घेऊन निवडून आले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदान ना मध्ये आज दिनांक 23 नोव्हेंबर रोजी अकोट येतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मतमोजणी करण्यात आली त्यामध्ये अकोट विधानसभा मतदारसंघातून 16 हजाराच्या वर मताधिक्यांनी आमदार प्रकाश भारसाकडे हे निवडून आले आहेत. त्यांची अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती पासून गाजत वाजत रथावर मिरवणूक काढण्यात आली आहे. यामध्ये वंचितचे दीपक बोडखे हे तिसऱ्या नंबर वर राहले तर दुसऱ्या नंबर वर महेश गणगणे राहले या मध्ये प्रकाश भारसाकडे यांना 93338 तर महेश गणगणे यांना74487 ,तर दीपक बोडखे यांना34132 , ॲड सुजाता वानखडे479 , सुनिल डोबाळे792, ललित बहाळे5955 , अन्सार उल्ला खान626, गोपाल देशमुख 177, नितीन वालसिंगे 187, राम प्रभू तराळे2381,825 लक्ष्मीकांत कौंठकर व वरीलपैकी कोणीही नाही ला 1161मते मिळाली आहेत तर 18851 एवढ्या मतांनी आमदार प्रकाश भारसाकडे हे तिसऱ्यांदा हॅट्रिक घेऊन विजयी झाले.
