बाळासाहेब गणोरकर:-अकोला जिल्हा प्रतिनिधी
मूर्तिजापूर : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात ‘मार्केट चा राजा’ गणेश उत्सव मंडळाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते.
गणेश चतुर्थीच्या शुभपर्वावर गेल्या दोन वर्षांपासून मुर्तीजापुर येथील बायपास स्थित असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात व्यापारी वर्ग, कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी, शेतकरी व मजदूर संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ‘मार्केट चा राजा’ गणेश उत्सव मंडळाच्या वतीने मोठ्या थाटा-मटात लाडक्या गणरायाच्या मांगल्यमूर्ती बाप्पाची गणेश चतुर्थीला प्राणप्रतिष्ठा केली जाते. तर पुढील दहा दिवस मनोभावे पुजाअर्चना करून महाआरती मोठ्या मंगलमय वातावरणात करण्याची परंपरा दोन वर्षांपासून अविरत सुरु आहे. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या परिसरात अनोखी दिव्य उत्साहऊर्जा संचारल्याचे जाणवते. भाविक मोठ्या हर्षवल्लाहासाने विविध प्रकारच्या आकर्षक सजावट करून लाडक्या बाप्पाला विराजमान करतात आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी मोदका सोबतच इतर विशेष चविष्ट नैवेद्य ही दाखवितात. दहा दिवसाच्या या उत्साहात फक्त मन रंगात घेऊन जातात. गणेश उत्सवात होणारा या दहा दिवस महाआरतीत जवळपास ३०० हून अधिक भाविक भगवी टोपी परिधान करून सकाळ -संध्याकाळ उपस्थित राहतात हे देखणीयचं.
बाप्पाच्या या महाआरतीला संजय महाराज पाचपोर, पंढरी महाराज दिगोडे, अजाबराव महाराज वहिले यांचे प्रमुख उपस्थिती लाभते.
