अंकित क-हे :-
बाळापूर तालुका प्रतिनिधी/ उरळ पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला पोलीसांचा क्यूआर कोड द्वारे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती उरळ पोलिसांच्या कडून दैनिक अजिंक्य भारत वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली आहे सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात व भक्तीमय वातावरणात साजरा होत आहे मात्र उरळ पोलिसांनी गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासमोर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यासाठी क्यूआर कोड लावण्यात आले आहे त्यामुळे मिरवणूक मार्गावर तसेच गावात वादग्रस्त वक्तव्य होणार नाहीत याची जवाबदारी देखील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला देण्यात आली आहे गावातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून शासकीय कर्मचारी असलेल्या पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पत्रकार, ग्राम शांतता समिती अध्यक्ष, यांच्या गावातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची विसर्जन तारिख व वेळ उरळ पोलिस स्टेशन येथे सादर करण्यात यावे अशे आदेश देण्यात आले आहे संपूर्ण ६८ गावातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, यांनी मिरवणूक मार्गावर गणेश मिरवणुक सुरू केल्यानंतर रात्री १० वाजेपर्यंत मिरवणूक काढण्यात यावी रात्री १० वाजेनंतर मिरवणूक काढण्यात आली तर संबंधित सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव,कार्यअध्यक्ष , सदस्य, यांच्या वर कडक कारवाई करणार असल्याची माहिती उरळ पोलिसांच्या कडून प्रसारित करण्यात आली आहे .
उरळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोपाल ढोले साहेब यांच्या वतीने संपूर्ण उरळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासमोर क्यूआर कोड लावण्यात आले आहे त्यावर आपल्या गावात आलेल्या पोलीस अधिकारी मिरवणूक सुरू झाल्यानंतर क्यूआर कोड स्कॅन करुन मिरवणूक सुरू झाल्याची माहिती उरळ पोलिस स्टेशन येथे सादर करण्यात येणार आहे नंतर रात्री १० वाजता क्यूआर कोड स्कॅन करुन मिरवणूक संपली असल्याची माहिती दिली जाणार आहे त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बँन्ड, डिजे, वाजणार नाही , सुचनेचे उल्लंघन केल्यास बँन्ड, डिजे, जप्त करण्यात येणार आहे पुढील वर्षापासून कायमस्वरूपी सार्वजनिक गणेशोत्सव, नवदुर्गा उत्सव मंडळाला परवानगी देण्यात येणार नाही आहे त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील सदस्यांनी नियमानुसार गणेश विसर्जन करावे अशी माहिती देण्यात आली आहे.
उरळ पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील विविध प्रकारचे प्रतिष्ठित नागरिक सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत त्यामुळे उरळ पोलिसांना गावातील सर्व माहिती पोलिस स्टेशन येथे मिळणार आहे व सर्व माहिती गुप्त ठेवण्यात येणार आहे संबंधित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यामुळे सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील सदस्यांनी नियमानुसार गणेश विसर्जन मिरवणुक शांतपणे पार पडावे अशी माहिती उरळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोपाल ढोले साहेब यांनी प्रत्येक गावातील पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पत्रकार, ग्राम शांतता समिती अध्यक्ष, उपस्थित होते,
गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मिरवणूक मार्गावर अडचण निर्माण होत असल्यास तातडीने उरळ पोलिस स्टेशन येथे संपर्क साधावा मिरवणूक मार्गावर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गावातील मिरवणूक मार्गावर उपाययोजना तातडीने करणे कोणत्याही परिस्थितीत वादग्रस्त वक्तव्य निर्माण झाल्यास जवाबदार स्वतः पुढील कारवाईसाठी ठरणार आहेत .
]]उरळ पोलिस स्टेशन ठाणेदार साहेब
उरळ पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा समोर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यासाठी क्यूआर कोड लावण्यात आले आहे त्यावेळी गावातील सर्व क्यूआर कोड स्कॅन केल्या नंतर सर्व माहिती उरळ पोलिस स्टेशन मध्ये मिळणार आहे त्यामुळे गावात कोणत्याही परिस्थितीत वादग्रस्त वक्तव्य होणार नाही याची काळजी घ्यावी…उरळ पोलिस स्टेशन ठाणेदार गोपाल ढोले साहेब ]]
]]नया अंदुरा व कारंजा ( रम) येथील पोलीस पाटील
उरळ पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम नया अंदुरा,व कारंजा (रम) येथे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणेश विसर्जन वेळेवर करण्यात येणार आहे मिरवणूक मार्गावर गावात कुठलाही प्रकारचे वादग्रस्त प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे…. गजानन कोगदे पोलीस पाटील नया अंदुरा,व कारंजा (रम)]]
