सचिन महाजन:-
वडनेर प्रतीनिधी
हिंगणघाट तालुक्यातील वेणी येथील रहिवाशी मंगळ गणेश काळे वय ३२यांचा सोमवारी सकाळी ९ वाजता शिवाजी मार्केट हिंगणघाट समोरून पायदळ रोड क्रॉस करतानी ट्रक ची जबर धडक देऊन मगल काळे यांच्या डोक्याला हाताला मार लागल्याने त्यांना हिंगणघाट सरकारी दवाखाण्यामधून सेवाग्राम येथे हलविण्यात आले.सेवाग्राम येथे मंगल काळे यांचा आयसिओ मध्ये आज सकाळी बुधवारी मृत्यू झाला. त्याच्या पच्यात आई वडील, भाऊ, पत्नी, मुलगी, बहिणी, मामा असा आप्त परिवार असून त्यांचा मृत्यू मुळे काळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहेत. तसेच परिसरात मंगल च्या मृत्यू मुळे हळहळ व्यक्त होत आहे.त्यांची अंतिम संस्कार मशान भूमी करण्यात येत आहे.