नंदु नागापुरे:-दानापुर प्रतिनिधी:-
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालय व अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय च्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत विविध स्पर्धा प्रकारात सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, हिवरखेड येथील विद्यार्थ्यांनी बाजी मारून १८ विद्यार्थी खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड झालेली आहे. यात १९ वर्षाखालील मुली या गटातून ४x४०० मीटर रिले प्रथम सहभागी विद्यार्थिनी खेळाडू गौरी बिलोने,सायली बोर्डे,प्रांजली बान्ते,गौरी ढोकणे व प्राची कानतोडे , हॅमर थ्रो प्रथम कु.रेणुका राऊत, १७ वर्षाखालील गटातून ४x १०० मीटर रिले प्रथम सहभागी खेळाडू हेमलता भोपळे,राखी मोहतुरे,श्रावणी वानखडे,
सपना पिंपळकर व प्रणिता गावंडे , हॅमर थ्रो द्वितीय क्रमांक कु.नेहा बाजारे व प्रणिता गावंडे हिने १०० मीटर हडल्स, १०० मीटर धावने या प्रकारात दुसरा क्रमांक पटकावून मुलींच्या गटातून ११ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तसेच १९ वर्षाखालील गटातून रामेश्वर देवानंद अरबे या विद्यार्थ्यांनी तिहेरी उडी,लांब उडी,२०० मीटर धावणे, रिले ४x४०० मध्ये प्रथम क्रमांक पटकावून एकाच विद्यार्थ्याने चार सुवर्णपदक मिळावीत नेत्रदीपक कामगिरी केली. रिले या प्रकारात . १७ वर्षाखालील मुले या गटात रामेश्वर अरबे,नितीन गावंडे,प्रेमकुमार नागपुरे,ओम राऊत व
शंतनू गावंडे यांचा समावेश असून ते जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकावर आहेत.या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत १८ सुवर्ण तर ३ रौप्य पदक मिळवीत १८ विद्यार्थी खेळाडू ९ मैदानी क्रीडा प्रकारात विभागस्तरावर अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या यशाबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे कार्यवाह श्यामशिल भोपळे,विभाग प्रमुख स्नेहल भोपळे, प्राचार्य संतोषकुमार राऊत, पर्यवेक्षक गणेश खानझोडे यांनी खेळाडूंना गौरविले. खेळाडू आपल्या यशाचे श्रेय आपल्या पालकांसह क्रीडा विभाग प्रमुख तथा प्रशिक्षक अक्षय मोरखडे,प्रतिभा इंगळे, माजी खेळाडू संकेत झगडे यांना देतात.