गणेश वाघ
ग्रामीण प्रतिनिधी कसारा
शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत माळ अंतर्गत तोरणवाडी ते शिदवाडी हे अंतर 3 किलोमीटरपाचशे ते सहाशे लोकवस्तीचे अवघ्या चार किमी अंतरावर असूनही या गावात जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. अतिशय खडतर प्रवास येथील लोकांच्या जणू पाचवीला पुजलेला असून यातुन सुटका होणारं कधी असा लोकांचा प्रश्न आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांना चार किमीचा खडतर प्रवास पायी करावा लागत असुन त्या सध्या येथेजाण्या-येण्यासाठी कच्चा रस्ता आहे. रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असुन त्यावरून ये-जा करने त्रासदायक होते आहे. त्यामुळे शिदवाडी येथुन शालेय विद्यार्थी व गर्भवती महिला आजारी व्यक्ती, वृद्ध नागरिक यांना अतिशय त्रास होत आहे सदर रस्त्यावरून वाहन चालवणे कठीण होत असल्याने वाहतुकीची सोय नाही त्यामुळे विद्याथी / महिला / नागरिकांना कामानिमित्त इतर ठिकाणी नाव्यासान ऋतासाहून अधिक पायपीट करावी लागते. त्यामुळे बऱ्याच विदयाथ्यानी अर्धवट शिक्षण सोडले आहे व आजारी व्यक्तींना उपचारविना राहावे लागत आहे. रस्ता नसल्याने पाण्याचे टँकर वेळेवर येत नाही .
@@@@@@@@@@@@@@@
कसाराऱ्या शहरांपासून अवघ्या बारा किमी अंतरावर असलेल्या तोरणवाडी – शिदवाडी गावातील रस्त्याची अवस्था बिकट झाली असून असून मागील पाच ते सहा वर्षांपासून खराब रस्त्याच्या सामना करतांना रहिवाशी मेटाकुटीला आले आहेत.
वैभव वाघ ग्रामस्थ माळ शिदवाडी.
@@@@@@@@@@@@@@@@@@@
जन्मापासून रस्ता ही समस्या आम्हाला सतावत असून आता अजुन किती दिवस ही समस्या आम्हाला त्रस्त करणार आहे.
दिनेश शिद ग्रामस्थ
