तेल्हारा प्रतिनिधी :-विलास बेलाडकर
तेल्हारा तालुक्यातील लहान खेड्यात राहून सर्व परिस्थिती वर मात करून वाकोडी रहिवासी व श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथील माजी खेळाडू विद्यार्थी शुभम राजेश गवारगुरू यांची आमी सैन्य दलात निवड झाली आहे त्या निमित्ताने त्यांचा सत्कार श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे करण्यात आला आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रमोद काळमेघ मुख्याध्यापक हे होते तर अतिथी म्हणून सौ प्रेरणाताई कराळे शिक्षक प्रतिनिधी,शांतीकुमार सावरकर सुनिल वंजारी बी जी पवार बळीराम कुवारे अंकेश भांबुरकर भारत भोवर अंकेश भांबुरकर धनंजय भंगाळे तूषार जाधव तेजराव कडू गजानन गावंडे विजय दहे उपस्थित होते तसेच शाळेतील माता पालक संघाचे सदस्य उपस्थित होते
यावेळी शुभम गवारगुरू यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार श्री प्रमोद काळमेघ मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आला आहे कार्यक्रम सुञसंचालन कु दुर्गा तायडे हिने केले आहे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी उपस्थित होते
