विठ्ठल येवोकार:-अकोट प्रतिनिधी
कथा प्रवक्ता संतोष महाराज ठाकरे वाशिमकर
रामापुर येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी घटस्थापनेच्या मुहूर्तावर आदर्श नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दुर्गा मातेची स्थापना दुर्गामाता चौकात मोठ्या जल्लोषात व मोठ्या भक्ती भावाने ३ ऑक्टोंबर रोजी दुर्गा मातेची स्थापना करण्यात आली. मंडळातर्फे ही परंपरा गेल्या २९ वर्षापासून चालु आहे दरवर्षीप्रमाणे गेल्या पाच वर्षापासून सुरू असलेल्या भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेचे आयोजन याही वर्षी करण्यात आले मंडळातर्फे भव्य सजावट वेगवेगळे देखावे महीला भजन मंडळ, गरुदेव भजन मंडळ कीर्तन ही करण्यात येते दररोज पूजा अर्चना महाआरती धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध स्पर्धा पार पडत आहेत पंचमीला देवीचा गोंधळाचा भव्य कार्यक्रम होतो सन १९९५ पासून मोठ्या गुन्या गोविंदाने दरवर्षी नवरात्री उत्सव साजरा करण्याची परंपरा गेल्या २९ वर्षापासून जपणारे आदर्श नवदुर्गा उत्सव मंडळ आहे या मंडळाचे २९वे वर्षापासून दरवर्षी अध्यक्ष पद बदलण्यात येते यावर्षी अध्यक्ष ज्ञानेश्वर मोहोळ हे असून सर्व सदस्य कार्यक्रम शांततेत पार पाडावे म्हणून परिश्रम घेत आहेत कुशल मार्गदर्शक कोंडीराम महाराज नागरगोजे आहेत दुर्गा उत्सवात सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने भक्ती भावाने सहभागी झाले आहेत दररोज सकाळी ६ वाजता काकडा तर ७ वाजता देवी आरती दुपारी १ ते ४ *श्रीमद् भागवत कथा प्रवक्त संतोष माहाराज ठाकरे वाशिमकर यांचे भागत कथा व सकळी ६ ते ७ हरिपाठ साडेसात वाजता आरती रात्री कीर्तन साडेआठ ते साडेदहा असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत महाप्रसादाचा कार्यक्रम व ग्रंथ आणि मूर्तीचे मिरवणूक मध्ये महीला मंडळ १३ऑक्टोंबर रोजी आहे दररोज शेकडो भाविक भक्त दुर्गा मातेचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करीत आहेत अष्टमीला होम पूजा होऊन नवमीला मिसळाची दाळ व ठेचा भव्य स्वरूपात भंडारा असून शेकडो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात दशमी म्हणजे दसऱ्याचे दिवशी संपूर्ण गावकरी या देवीला परंपरेनुसार आपट्याचे पाने सोने म्हणून चढवतात दुसऱ्या दिवशी देवीच्या मिरवणुकीमध्ये ढोल भजनाच्या गजरात गाव प्रदक्षिणा होऊन पोपटखेड येथे धरणावर विसर्जन करण्यात येते या मंडळाला अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन कडून रिक्सर परवानगी असते गावातील नागरिक व दुर्गा उत्सव मंडळ यांच्या मेहनतीने हा कार्यक्रम शांततेत पार पडतो
