तेल्हारा प्रतिनिधी :-विलास बेलाडकर
तेल्हारा येथे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्रारा संचालित श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथील खेळाडू जय अनंता दही याची निवड अकोला जिल्हा शालेय कुस्ती स्पर्धेसाठी 14 वर्ष वयोगटात झाली आहे
जय अनंता दही हा खेळाडू कुस्ती पैलवान आहे ग़ामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळासाठी विशेष सुविधा श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या माध्यमातून देण्यात येतात श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथील अनेक खेळाडू राष्ट्रीय, राज्य, विभागीय पातळीवर खेळात सहभागी होतात.तसेच सैन्य भरती पोलिस भरतीसाठी खेळाडू सहभागी झाले आहेत.या खेळाडू ना मार्गदर्शन शांतीकुमार सावरकर क़िडा शिक्षण शिक्षक हे करतात यशस्वी खेळाडू चे अभिनंदन श्री सुरेशदादा खोटरे साहेब कार्यकारिणी सदस्य तथा शाळा समिती सदस्य श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा सर्व शाळा समिती सदस्य, परिसरातील आजिव सदस्य श्री प्रमोद काळमेघ मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी केले आहे
