– विलास बेलाडकर:-तेल्हारा प्रतिनिधी:- काल रात्रीच्या 12 वाजेच्या
दरम्यान तेल्हारा तालुक्यातील गाव वडगाव रोठे येथे हिमाचल प्रदेश मधील इसमाची हत्या करण्यात आल्याची घटना तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे आहे. की हिमाचल
प्रदेश मधील जिल्हा जंम्बा ग्राम सुहागालू येथील
रहिवासी सुनील कुमार देसराज वय (42) व
काकणवाडा येथील रहिवासी असलेला गजानन
देवदास सोळंके वय 35 याच्यासोबत हिमाचल प्रदेश
येथून ग्राम वडगाव रोड येथे आला होता. सोळंके हा
हिमाचल प्रदेश येथे महाराज म्हणून प्रचलित होता.
सुनील कुमार हा शिष्य म्हणून गजानन सोळंके
याच्यासोबत राहत असे सुनील कुमार व गजानन हे
दोघे ग्राम वडगाव रोठे येथे आले होते. काल रात्री
तेल्हारा पोलिसांना माहिती मिळाली की वडगाव रोठे
येथे एका इसमाला मारहाण करण्यात आली.
त्यावरून पोलिसांनी वडगाव रोठे येथे जाऊन सुनील कुमार व गजानन या दोघांना ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे उपचाराकरिता आणले होते यामध्ये दोघेही दारूच्या
नशेत होते सुनील कुमार याला जबर मारहाण केल्याने
ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. असता
त्याचा मृत्यू झाला तर गजानन सोळंके हा
दवाखान्यामधून पळून गेला होता. यामध्ये तेल्हारा
पोलीसांनी गजानन सोळंके याचा शोध घेतला असता
आज बारा वाजेच्या दरम्यान गौतमेश्वर मंदिरा जवळून
मोठ्या शिताफितीने गजानन सोळंके याला
पकडण्यात आले. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल
करण्याची प्रक्रिया सुरू होती पुढील तपास ठाणेदार
उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. निलेश
ठाकरे हे करीत आहेत.गजानन सोळंके व सुनीलकुमार हे काल रात्री दारू पिले होते यादरम्यान दोघांमध्ये कुठला वाद झाला याबाबत माहिती मिळाली नसून मृतकाच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात जखमा असून ही हत्या का करण्यात आली याबाबत पोलीस तपास करीत आहेत. यामध्ये गजानन सोळंके हा मिळालेल्या माहितीनुसार गुन्हेगारी स्वरूपाचा असून बऱ्याच वर्षांपासून काकनवाडा गाव सोडून गेलेला होता.
