बाळासाहेब गणोरकर -:अकोला जिल्हा प्रतिनिधी
मूर्तिजापूर : तालुक्यातील ग्राम येथे मनाला हेलावून टाकणारी हृदयदायक दारूच्या नशेत धुंद असलेल्या प्रकाश दिनेश इंगळे या युवकाचा नदीपात्राच्या गाळात अटकून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 13 सप्टेंबर रोजी दोन ते तीन वाजताच्या सुमारास घडली आहे .
हकीकत अशी की प्राप्त माहितीवरून आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी दोन ते तीन वाजताच्या सुमारास कुणीतरी अज्ञात इसम हा नदीपात्राच्या गाळात अटकून असल्याचे समजले, त्यावेळी मुस्लिम बांधवांनी या युवकास गाळातून बाहेर काढून त्याची ओळख तेथील काही इसमांना पटली, व तो माना येथील प्रकाश दिनेश इंगळे असल्याचे निष्पन्न झाले, तेथून त्याला मूर्तिजापूर येथे रुग्णालयात नेत असताना अचानक त्याचा मृत्यू झाला असल्याचे समजते, या युवकाला दारूची सवय झाली असल्याने तो नेहमी घरात त्रास द्यायचा, घरून तो दोन ते तीन दिवस अगोदर बेपत्ता झाल्या असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले, दारूच्या नशेत तो कुठेही फिरत असायचा, त्याच्या मृत्यूने त्याच्या घरच्या आई-वडिलांवर संकटाचा पहाड कोसळला असून त्याच्या आईने एकच हंबर्डा ओरडला,
वृत्त लिहीपर्यंत अद्यापही पोलीस केस झाली नसून त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नाही
