विनोद संगने:-सिरसोली
सिरसोली : येथील स्व बाबासाहेब खोटरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तेल्हारा तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश मिळविले आहे.
19 वर्ष वयोगटात 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत ऋषिकेश भास्कर वाघ याने तालुक्यातून प्रथम क्रमांक व 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला.
17 वर्षे वयोगटात 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत संघर्ष अनिल गवई याने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला.
17 वर्षे वयोगटात 400 मीटर धावणे या स्पर्धेत रोहित उमेश हिवराळे या विद्यार्थ्याने तालुक्यातून तृतीय क्रमांक पटकाविला.
वरील सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर क्रीडा स्पर्धे करता निवड झालेली आहे.
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष श्री सुरेश दादा खोटरे, सचिव श्री वसंतरावजी खोटरे, उपाध्यक्ष मधुसूदनजी खोटरे, उपाध्यक्ष सुखरामजी आखरे, सहसचिव ह.भ.प. विनायक दादा खोटरे व सर्व संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय आपले आई-वडील, प्राचार्य मिलिंद खोटरे सर, क्रीडा शिक्षक प्रमोद आखरे सर तसेच सर्व शिक्षक वृंद, शिक्षिका व व कर्मचारी वर्गाला दिले आहे.
