चांगल्या अध्यापनाच्या केल्या अपेक्षा व्यक्त
विनोद सगणे =तेल्हारा तालुका प्रतिनिधी _
सिरसोली ::– तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या शिरसोली येथील जिल्हा परिषद मराठी शाळेवरील महिला शिक्षकांचा स्थानिक ग्रामस्थ ग्रामपंचायत प्रशासन व पत्रकार बांधवाचे वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला व त्यांच्याकडून आपल्या पाल्यांना चांगल्या अध्यापनाच्या अपेक्षा ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्या
गत काही दिवसापासून येथील जिल्हा परिषद शाळेतील अंतर्गत वादामुळे उर्वरित शिक्षकांचे अध्यापनाकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने पालकांनी आपल्या मुलांना या शाळेतून काढणे सुरू केले होते या शाळेवर तीन पुरुष शिक्षक व पाच महिला शिक्षिका कार्यरत आहेत यामधील महिला शिक्षिकेंचे अध्यापन एकदम चांगले असल्याने शाळेतील विद्यार्थी या महिला शिक्षकांसाठी आम्हाला त्या शिक्षिका द्या अशी मागणी करतात त्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याने त्यांचा सत्कार व्हावा हा हेतू मनात ठेवून येथील ग्रामपंचायत प्रशासन व पत्रकार बांधवांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रभारी मुख्याध्यापक सुनंदाताई गावंडे सहाय्यक शिक्षिका साधनाताई पाटील; रेणूताई शाहू; जयश्रीताई लाटे व मोनिका चौखंडे या पाच महिला शिक्षकांचा सरपंच सारिका वानरे; माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य किरण ताई गुहे; निलोहर शाहीन झिया शहा; सुलभाताई इंगळे यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा येथोचित सत्कार केला. यावेळी प्रास्ताविक प्रकाश बडगे यांनी करून सत्काराचे आयोजन का करण्यात आले याबाबत विस्तृत माहिती दिली तर झिया शहाअहेमद शहा ; संतोष ताकोते यांनी मनोगत व्यक्त केले तर आम्ही आमची शाळा ही कुटुंब समजतो आमच्या महिला शिक्षकांमध्ये कोणताही वाद नाही मात्र काही गोष्टीमुळे यावर्षी जवळपास ८० विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्याने आम्ही खूप नाराज आहोत या शाळेची पटसंख्या वाढण्यासाठी आपण ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करावे अशी अपेक्षा सत्काराला उत्तर देताना त्या महिला सत्कारमूर्ती शिक्षकांनी केली तसेच आजपर्यंत आमचे कार्यकाळात आमचा हा पहिला सत्कार असल्याने चांगल्या वागणुकीची दखल घेतल्या जाते असेही त्यांनी सांगितले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राहुल भारसाकडे; सरपंच सारिका वानरे ;किरणताई गुहे; निलोफर शाहीन ; सुलभाताई इंगळे; पत्रकार संतोष ताकोते; विनोद सगणे ;लालसिंग अडाणी ;प्रकाश बडगे ;चेतन गुहे ;झियाशहा ;सिद्धार्थ धुंदे ;प्रवीण वानरे ;प्रज्वल तायडे यांच्यासह बहुसंख्य नागरिक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
