बाळासाहेब गणोरकर:-अकोला जिल्हा प्रतिनिधी
मूर्तिजापूर : तालुक्यातील दर्यापूर या राज्य मार्गावरील दुर्गवाडा फाट्यावर अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथून अकोल्याकडे सात गोवंश जातीच्या जनावरांना निर्दयपणे कोंबून विनापरवाना कत्तलीसाठी घेवून जात असलेल्या वाहनाला मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी रविवारी सकाळी ४ वाजताच्या दरम्यान नाकाबंदी लावून पकडले असून अंधाराचा फायदा घेत दोन आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले .
सदरच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक रणजीत खेडकर , पो.कॅ!.गजानन सयाम , रितेश मद्दी , वाहनचालक इरफान हे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात रात्रीच्या वेळी गस्तीवर असताना गुप्त बातमीदारकडून माहिती मिळाली की, भातकुलीकडून अकोल्याकडे जाणारे वाहन क्र. एम एच ३० बी डी ४३३५ यामध्ये गोवंश जातीच्या जनावरांना विनापरवाना कत्तलीसाठी तस्करी केल्या जात आहे .
या माहितीच्या आधारे पोलिसांनी दर्यापूर मार्गावरील दुर्गवाडा फाट्यावर नाकाबंदी करून येणाऱ्या वाहनाला हात दाखवून थांबविण्याचा प्रयत्न केला .मात्र चालकाने आपले वाहन लाखपूरी च्या दिशेने वळविले , दरम्यान चालकाचे नियंत्रण हटल्याने मार्गाच्या डाव्याबाजूला वाहन उभे करून अंधाराचा फायदा घेत चालक व सोबत असलेला इसम हे घटनास्थळावरून पसार झाले .
पोलिसांनी वाहनांची झाडाझडती घेतली असता गोवंश जातीचे ७ बैल निर्दयपणे कोंबून बांधून असल्याचे दिसले. ७ बैलाची किंमत १ लाख २७ हजार तर वाहन किंमत ४ लाख असा एकूण ५ लाख २७ हजाराचा मुद्देमाल पंचासमक्ष घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला असून जनावरांना संत पुंडलीक बाबा संस्थानात दाखल करण्यात आले .
सदरच्या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम २८१ , भा. न्या. स. सहकलम ५ (अ)(१)(२) ,५(ब)९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बच्चनसिंग , अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे , उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्रीधर गुट्टे , उपनिरीक्षक चंदन वानखडे , रणजीत खेडकर , पो.का. गजानन सयाम ,रितेश मद्दी , इरफान यांनी केली आहे.