विलास बेलाडकर:-प्रतिनिधी
तेल्हारा दि.२५(ता.प्र)एकात्म मानववादाचे प्रणेते पंडीत दीनदयाल उपाध्याय यांची १०८ वी जयंती दि.२५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता तेल्हारा येथे भारतीय जनता पक्षाच्या तेल्हारा तालुक्याच्या वतीने साजरी करण्यात आली. उंबरकार कॉम्पलेक्समधील भाजपा कार्यालय येथे पार पडलेल्या जयंती उत्सवप्रसंगी उपास्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन,हारार्पण करण्यात येवून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष केशवराव ताथोड , तालुकाध्यक्ष गजानन उंबरकार, मा.शहर अध्यक्ष महेंद्र गोयनका, जिल्हा सचिव रवि गाडोदिया, तालुका सरचिटणीस सतीश जयस्वाल, तालुका उपाध्यक्ष गजानन गायकवाड,विजय देशमुख, भाजयुमो तालुका अध्यक्ष गणेश इंगोले, शहर सरचिटणीस योगेश आप्पा बिडवे , माजी नगरसेवक नरेश आप्पा गंभीरे, मंगेश सोळंके, खरेदी विक्री उपाध्यक्ष राजुभाऊ टोहरे, भाजयुमो शहर अध्यक्ष सुयोग चहाजगुणे, बाळासाहेब पवार, आकाश फाटकर,छोटु विखे, सतीश चहाजगुणे, गोकुळ हिंगणकर, श्रीकांत भारसाकळे,भुषण देशमुख, भावेश पवार, प्रतीक डांबरे, रुपेश चव्हाण, उमेश खंडारे, सचिन सपकाळ, पंकज देशमुख, शिवा खाडे, विशाल ठाकरे व अंकुश बुरघाटे यांची उपस्थिती होती.
