संग्रामपूर तालुका प्रतिनिधी:- प्रभुदास पारस्कार
जिल्हा परिषद बुलढाणा व ओपन लिंक फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा(बा) ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्या अनुषंगाने ऑगस्ट महिन्यात बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका स्तरावरील ‘पोस्ट ऑफ द मंथ’ विजेते शिक्षक श्री. देविदास नामदेव बावस्कार जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक, टुणकी बुद्रुक तालुका संग्रामपूर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदरील पुरस्कार मा. सुधिर भिसे गटशिक्षणाधिकारी संग्रामपूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी मा.मोरखडे विस्तार अधिकारी , मिलिंद सोनोने गट समन्वयक , गौतमराव मारोडे उच्च श्रेणी मुख्याध्याप तसेच संदीप रहाटे,अज्ञानसिंग राठोड डाटा एन्ट्री ऑपरेटर , जाधव सर (शिक्षक)तथा विनोबा भावे शिक्षक सहाय्यक प्रशिक्षण कार्यक्रमाचे शेख नजीर जिल्हा समन्वयक उपस्थित होते.
मा .गटशिक्षणाधिकारी भिसे सर यांनी पुढील कार्यास श्री देविदास बावस्कर सरांना शुभेच्छा दिल्या व जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना प्रेरणा द्यावी अशा प्रकारे अपेक्षा त्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली. तसेच उपस्थित मान्यवरांच्या वतीने श्री बावस्कार सर यांना पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या