संग्रामपुर तालुका प्रतिनिधी :-प्रभुदास पारस्कार
संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथील शिवशक्ती पेट्रोल पंपाजवळ एसटी बसचे समोरील चाक निखळून रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन पडले सदैवाने जीवित हानी झाली नाही . जळगाव (जा) आगाराची बस क्र MH06-S 8387 चालक श्री.ए ए मालठे व वाहक श्री. आर डी ठाकरे आकोट वरून टुनकी मार्गे प्रवाशांना घेऊन जळगाव (जा) कडे येत असतांना अचानकपणे बसचे समोरील चाक निखळून रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पळाल्याची घटना दि 10 सप्टेंबर 2024 रोजी 5:30 ते 06:00 सुमारास घडली . एसटी बस चालक श्री ए ए मालठे यांच्या सतर्कतेने मोठा अपघाताला टळला . सविस्तर असे की जळगाव (जा) आगाराची बस क्र. एम एच 06 एस 8387 ही अकोट वरून जळगाव (जा) करिता 30 ते 35 प्रवासी घेऊन येत असताना 5:30 ते 06:00 च्या सुमारास टुनकी जवळील शिवशक्ती पेट्रोल पंपाजवळील खड्ड्यातून बसचे समोरील चाक जाताच निखळून रस्त्यालगतच्या शेतात जाऊन पडले . प्रसंगावधाने मोठा अपघात टळला व सुदैवाने कोणत्याही प्रवाशांना दुखापत झाली नाही . एसटी बस चालक श्री ए ए मालठे यांनी बस वरली नियंत्रण सुटून न देता तसेच त्यांच्या सतर्कतेने बस मधील 30 ते 35 प्राण वाचवले .बस मधील सर्व प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेत बस चालकाचे आभार मानले . तसेच तात्काळ बस मधील प्रवाशांसाठी दुसऱ्या एटी बसची व्यवस्था करण्यात आली व पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले . जळगाव (जा) ते अकोट राज्य मार्गावरील टुनकी येथील शिवशक्ती पेट्रोल पंप जवळील व सोनाळा ते सगोडा फाडा दरम्यान मोठमोठे खड्डे असल्यामुळे लहान मोठ्या वाहनासाठी धोकादायक ठरत आहे . यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही . ही सर्व खड्डे तात्काळ भरण्यात यावी अशा प्रकारची मागणी परिसरातील सुज्ञ नागरिकांमधून होत आहे .
