सचिन महाजन हिंगणघाट प्रतिनिधी) स्थानिक गांधी वार्डातील गणेश मंदिर मार्गावरील बेकायदेशीर व अस्ताव्यस्त पार्किंग विरोधात येथील समाजसेवी, सुवर्ण व्यावसायिक सुभाष निनावे यांनी आपल्या निवासस्थानासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. पोलीस प्रशासन व नगरपरिषद प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. प्रभाग क्रमांक १३ मधील गांधी वार्डातील गणेश मंदिर मार्गावर बँक, पतसंस्था, व्यावसायिक संकुल असून यामध्ये नियमानुसार पार्किंगची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही. परिणामी वर्दळीच्या रस्त्यावरच वाहने उभी केली जात आहे. तसेच या रहिवासी परिसरात गल्लीबोळात सुद्धा दुचाकी, चार चाकी वाहनांची पार्किंग होत असल्याने नागरिकांना घरापर्यंत पोहचण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. यासंदर्भात निनावे यांनी उप विभागीय अधिकारी कार्यालय, नगरपरिषद तसेच पोलीस प्रशासनास वारंवार लेखी तक्रारी दिल्या. परंतु प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने निनावे यांनी आपल्या घरासमोरच बेमुदत उपोषण सुरू केले . सदर उपोषणाची पोलीस प्रशासन व नगरपरिषद प्रशासनाकडून त्वरित दखल घेण्यात आली. या परिसरातील अस्ताव्यस्त पार्किंग सुरळीत करण्याकरीता पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल . तसेच पालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल असे लेखी आश्वासन ठाणेदार मनोज गभने, नगर रचनाकार खोब्रागडे, पालिका अभियंता जगदीश पटेल यांचे वतीने देण्यात आले आले. यानंतर ठाणेदार गभने यांनी निनावे यांना लिंबू पाणी देऊन उपोषणाची यशस्वी सांगता केली. उपोषण मंडपाला माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा, डॉ. निर्मेशकोठारी ,प्रा. किरण वैद्य केशव तीतरे, अशोक सोरटे, अभिनंदन मुनोत, डॉ. ललवाणी, दीपक कापसे, भिमराव मून, जगदीश प्रसाद शुक्ला, राजू देवगिरकर, रमेश गांधी, पिंटू गांधी, राजू भरने , रवी डुंगरवार, बालू बावनकर पप्पू वैद्य, अंकुश सायंकार, लोकेश लोखंडे, अनिल निनावे, आकाश निनावे, चेतन निनावे, अजय देवगिरकर, उमेश कटारिया, वेदांत गौळकार, शुभम बोबडे, लक्ष्मीकांत निनावे, माधवराव शेंडे सूर्यभान हेडाऊ , खुशाल निनावे आदी शहरातील गणमान्य नागरिक, प्रतिष्ठित व्यावसायिक, पत्रकार यांनी उपोषण मंडपाला भेट दिली.
