सचिन महाजन हिंगणघाट
प्रतिनिधी 9765486350
येथील शिवसाई बजरंग गणेश मंडळ व सूरज कुबडे मित्र परिवाराच्या मदतीने दि 12 सप्टेंबरला बीएसएफ मधून निवृत्त झालेले दिनेश नरड व महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या प्रभागातील तीन युवक धीरज नंदरे, शुभम तडस, कुणाल शिंदे, यांचा शाल श्रीफळ व वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध चित्रकार हरिहर पेंदे हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कृषीनिष्ठ शेतकरी रवींद्र वैद्य, तभा प्रतिनिधी सतीश वखरे, रुग्णमित्र गजू भाऊ कुबडे, दादाजी कुबडे, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष धनुजीं
डंभारे उपस्थित होते.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज,वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर सीमा सुरक्षा दलातून निवृत्त झालेले जवान दिनेश नरड, व पोलीस दलात भरती झालेल्या आई वडिलांचा सन्मान करण्यात आला. यात श्रीमती गीताबाई देवनाथ नंदरे,सौं चंदा रमेश तडस,व संगीता नरेश शिंदे यांनी सत्कार स्वीकारले.
या प्रसंगी हरिहर पेंदे, सतीश वखरे, रवींद्र वैद्य, गजूभाऊ कुबडे निवृत्त जवान दिनेश नरड यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक सूरज कुबडे यांनी केले.आभार दादाजी कुबडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्या साठी सर्वश्री अजय झलके, अमोल टिचूकले, किरण मडावी, आशिष कुबडे, आकाश मडावी, सचिन तोडसाम, राहुल चिंचुलकर, विक्रम सुरकार,लोकेश मांडवकर, पवन काशिपुत्र, अक्षय भोयर, अक्षय निशाणे,अमोल वाघमारे, निखिल महाजन,सुरज जय पोटे, प्रणय नांदुरकर,मडावी, संकेत सातपुते, गणेश मांडवकर, अथर्व झलके, गुड्डू, दर्शन धानोरकर, साहिल चिंचुलकर,यांनी परिश्रम घेतले.