धिरज संतोष बजाज हिवरखेड प्रतिनिधी =
हिवरखेड येथील आकोट जळगाव तेल्हारा या टी पॉइंटवर ओम शक्ती ढाब्यासमोर स्वाद ढाब्या नजीक उमेश फोपसे आणि अबरार खान यांचा पार्टनरशिप मध्ये माऊली केला सप्लायर्स नावाने केळीचा व्यवसाय आहे. त्यांच्या ऑफिसवर दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी केळी व्यवसायिकांकडून शेतकऱ्यांना चुकविण्यासाठी मोठी रक्कम आली होती. याची जाण असणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी बरोबर त्याच दिवशी रात्री जबरी चोरी करत जवळपास सात लाख रुपये नगदी लंपास केल्याची केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्यांनी रात्रंदिवस वाहणाऱ्या राज्य मार्गावरील दुकान फोडून त्यामधील मोठा लोखंडी कपाट बाजूच्या शेतात नेऊन फोडला आणि त्यातील रक्कम लंपास करून अकोला जिल्हा पोलीस दल आणि हिवरखेड रुपराव पोलिसांना खुले आव्हान दिल्याचेच दिसत आहे. चोरट्यांनी चालाखी करत अनेक सीसीटीव्ही कॅमेरे अस्ताव्यस्त करून इतरत्र फिरवून ठेवले होते. परंतु नजर चुकीने त्यांचे एक कॅमेरावर लक्ष राहिले नाही आणि त्याच कॅमेऱ्याने त्यांचा घात केला आणि काही चोरटे सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाले. सीसीटीव्हीत कैद झालेल्या चोरट्यांना अकोला आणि हिवरखेड पोलीस किती लवकर कैद करतात की पकडू शकत नाहीत याकडे जनतेचे लक्ष आहे. दरम्यान घटनास्थळावर श्वान पथक फॉरेन्सिक टिम आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत.
