संग्रामपूर तालुका प्रतिनिधी :-
प्रभुदास पारस्कार
बुलढाणा(ऑक्टोंबर 2024)
जिल्हा परिषद बुलढाणा व ओपन लिंक फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा(बा) ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सप्टेंबर महिन्यात बुलढाणा जिल्हयातील संग्रामपूर तालुका स्तरावरील ‘पोस्ट ऑफ द मंथ’ विजेते शिक्षिक सौ. आशा वसंत गाढे मॅडम जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा चोंडी आणि श्री. संतोष रामदास शेळके जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा पेसोडा तालुका संग्रामपूर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. माननीय भिसे (गटशिक्षणाधिकारी संग्रामपूर) यांच्या वतीने सदरील पुरस्कार मा. मोरखडे (शिक्षण विस्तार अधिकारी संग्रामपूर) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाला वानखडे सर (साधन व्यक्ती) चव्हाण सर (साधन व्यक्ती). मिलिंद सोनुने (गट समन्वयक),केंद्र प्रमुख शाम कौलकर,अनिल धनभर, पठाण सर, अबगड सर, दिनेश तायडे सर, भीमराव वानखेडे, सर,राहुल इंगळे सर, सूरत्ने सर, इंगळे सर, रहाटे सर, राठोड सर तथा विनोबा भावे शिक्षक सहाय्यक प्रशिक्षण कार्यक्रम चे (जिल्हा समन्वयक) शेख नजीर उपस्थित होते.
माननीय शिक्षण विस्तार अधिकारी मोरखडे यांनी पुढील कार्यास सौ. आशा गाढे आणि संतोष शेळके यांना शुभेच्छा दिल्या व तालुक्यातील सर्व शिक्षकांना प्रेरणा द्यावी अशा प्रकारे अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
